Breaking

मोठी बातमी : तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील बहुमताने विजयी


जळगाव : जिल्ह्यातील भादली ग्रामपंचायत निवडणूकीत तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील बहुमताने विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या शमिभा पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.शमिभा पाटील म्हणाल्या, हा विजय आंबेडकरी विचारधारा, वंचित बहुजन आघाडीचा विजय आहे. 


जळगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 1 जानेवारीला छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत जळगाव तहसील कार्यालयात अंजली पाटील यांच्या उमेदवारी अर्जावरून चांगलेच ‘महाभारत’ घडले. अखेर ते प्रकरण न्यायालयात गेले आणि  महिलेच्या जागेवर लढण्याचा तृतीयपंथीयाला अधिकार असल्याचा निर्वाळा औरंगाबाद खंडपीठानं दिला होता.

या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अंजली पाटील या बहुमताने विजयी झाल्या असून बहुजन वंचित आघाडीचा राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीतील हा मोठ्या विजय असल्याचे बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा