Breaking
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ २३ ते २६ रोजी मुंबईत होणाऱ्या 'महापाडाव'मध्ये विद्यार्थ्यांनी हजारोंच्या संख्येने सामिल व्हावे - SFIएसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटीचे राज्यभरातील विद्यार्थ्यांना आवाहन !


मुंबई : देशाची राजधानी दिल्लीत मागील दोन महिन्यांपासून शेतकरी आपल्या न्यायी मागणीसाठी आंदोलनास बसले आहेत. शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी दिनांक २३ ते २६ जानेवारीला मुंबईत 'महापाडाव' होत आहे. यात राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांसह कामगार, महिला आणि युवक सहभागी होणार आहेत. यात राज्यातील विद्यार्थ्यांनी देखील हजारोंच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या वतीने राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड व राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी केले आहे.


एसएफआय म्हटले आहे की, शेतकरी आंदोलनास अगदी सुरुवातीपासूनच एसएफआयने पाठिंबा दिलेला आहे. दिल्लीच्या सीमेवर आणि देशातील वेगवेगळ्या भागात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनामध्ये विद्यार्थ्यांना सोबत घेऊन एसएफआय रस्त्यावर उतरली.


दिनांक २३ जानेवारी रोजी नाशिक येथून हजारो शेतकऱ्यांचा वाहन मोर्चा मुंबईकडे निघत आहे. यास एसएफआयने संपूर्ण सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सामिल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा