Breaking

वडवणी : लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरावडवणी : वडवणी शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे अध्यक्ष पंजाबराव मस्के, कार्यवाह अमरसिंह मस्के, प्राचार्य डॉ. के. एम. पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. 


महाविद्यालयाचे अध्यक्ष पंजाबराव मस्के पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्काऊट गाईड युनिटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख व उपप्राचार्य प्रा. सतीश भालेराव डॉ. महेश राजे निंबाळकर कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. गोपीचंद घायतिडक, डॉ. गोविंद पांडव, डॉ. सच्चिदानंद तांदळे, प्रा. सुधीर पोकळे, डॉ. राम मायकर, डॉ. भालचंद्र कुलकर्णी, प्रा.अशोक खेत्री, प्रा. संजय साळुंके, डॉ. मनीषा ससाने, प्रा. नागनाथ साळुंके, प्रा. जी.के. घोडेराव, प्रा. गोपाळ मस्के, प्रा. ज्ञानेश्वर शेंडगे, प्रा. प्रतिभा शेळके, डॉ. विकास शिनगारे, प्रा. देविदास दडपे, प्रशांत पवार, प्रकाश खळगे, मकरंद देशमुख, पंकज दुबे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा