Breaking

वडवणी : लोकमान्य टिळक महाविद्यालयात नामविस्तार दिन उत्साहात साजरावडवणी : शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष पंजाबराव मस्के पाटील, प्राचार्य डॉ. के. एम .पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्त "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020" या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. वेबिनारचे अध्यक्ष पंजाबराव मस्के पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 


प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एम. पवार यांनी केले. बीजभाषक बी एम सी सी, पुणे येथील  प्रोफेसर डॉ. प्रशांत साठे यांनी आपल्या बीज भाषणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी आपली भूमिका मांडली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काळाशी सुसंगत असल्याचे मत त्यांनी मांडले. पिपल्स कॉलेज, नांदेड येथील डॉ. डी. एन. मोरे यांनी रिसोर्स पर्सन म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयी आपली भूमिका मांडताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी का आवश्यक आहे ते सांगितले.


सूत्रसंचालन आय क्यू ए सी को-ऑर्डिनेटर आणि कन्वर्टर प्रा. संजय साळुंके यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय वेबिनार मध्ये असंख्य लोकांनी ऑनलाइन सहभाग घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा