Breaking
वडवणी : लोकमान्य टिळक महाविद्यालयात हिंदी विभागाचे ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्र संपन्नवडवणी :  येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात  वर्तमान हिंदी साहित्यातील आव्हाने (समकालीन हिंदी साहित्य की चुनोतियां) या विषयावर गुगल मीट प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. 


या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंजाब काका मस्के पाटील हे होते. या चर्चासत्राचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किसन पवार यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक विद्यार्थ्यांमधील प्रत्यक्ष संबंध संपुष्टात आलेले आहेत. अशा परिस्थितीत महाविद्यालयीन शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी कशाप्रकारे भाषा आणि साहित्य या बाबत संवाद साधावा, ही मूळ कल्पना या राष्ट्रीय चर्चासत्राची होती.


या उपक्रमात औरंगाबाद विद्यापीठाचे अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य प्रा. बळीराम धापसे यांनी आपले विचार व्यक्त केले. वाराणसी येथून प्रोफेसर अशिष त्रीपाठी यांनी वर्तमान हिंदी साहित्यातील विचारधारा, आव्हाने यांचे स्वरूप विस्तारपूर्वक मांडले. यानंतर पुणे विद्यापीठातील डॉ. राजेंद्र घोडे यांनी वर्तमान हिंदी कविता आणि समाज चित्रणातील  साहित्यिक आव्हाने या विषयी विचार व्यक्त केले.


या ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्रात महाराष्ट्रासह इतर राज्यातील अनेक प्राध्यापक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ. गोविंद पांडव यांनी केले. यासाठी महाविद्यालयाचे डॉ. सचिदानंद तांदळे, प्रा. सुधीर पोकळे, अशोक खेत्री, डॉ. भालचंद्र कुलकर्णी, डॉ मनीषा ससाने, प्रा. संजय साळुंके, देविदास दडपे, डॉ राम मायकर, प्रा. गोपीचंद घायतिडक, प्रा. गंगाधर घोडेराव, प्रा. नागनाथ साळुंके, प्रा. गोपाळ मस्के,  प्रशांत पवार इत्यादी यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा