Breaking

वडवणी : चोंडेश्वरी उत्सवानिमित्त चोंडेश्वरी जनजागृती विचार मंथन अभियानाच्या वतीने महारक्तदान शिबिर संपन्नवडवणी : चोंडेश्वरी उत्सवानिमित्त चोंडेश्वरी जनजागृती विचार मंथन अभियानाच्या वतीने महारक्तदान शिबिर संपन्न झाले.


प्रतिवर्षी पोष पौर्णिमा निमित्त वडवणी येथील कापड तयार करणारा विणकर समाज ज्याला आपण कोष्टी समाज म्हणून ओळखतो या कोष्टी समाजाचे कुलदैवत माता चोंडेश्वरी देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, या दरम्यान भरगच्च सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात व याला जिल्हा बाहेरून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.


यावर्षी कोरोना प्रादुर्भावमुळे चोंडेश्वरी जनजागृती विचार मंथन अभियानाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या दरम्यान ११७ रक्तदात्यांनी सर्वश्रेष्ठ असे रक्तदान केले. यावेळी या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ह.भ.प. बाळूदेव महाराज काळे, ह.भ.प. नवनाथ महाराज चिनके यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे, सर्जेराव आळणे, कचरू झाडे, नवनाथ म्हेत्रे, विठ्ठल भुजबळ, नागेश डिगे, अंकुश वारे, सुरेश ढवळशंख, दत्ता आलगट, दादासाहेब भंडारे, दिगंबर गुरसाळी, अरुण गुरसाळी, डॉ. नारायण आळणे, डॉ. पुरुषोत्तम डिगे, डॉ.कुरकुटे, रमेश टकले, कचरू रेडेकर, सिद्धेश्वर ढवळशंक, किरण रेडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चौंडेश्वरी जनजागृती विचारमंथन अभियानचे दिगंबर आलगट, गणेश म्हेत्रे, गोरख बागडे, लक्ष्मण भंडारे, सुदाम खटावकर, श्रीकृष्ण उंडाळे, विठ्ठल खरपे कैलास दुधाने, संजय बोत्रे, सागर म्हेत्रे, डॉ. जगदीश टकले, डॉ. सिताराम आळणे, गणेश भागवत, विनोद आसलकर, कृष्णा पंधारे, ऋषी, कृष्णा झाडे, डॉ. महादर, मंगेश बुचडे आदींनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा