Breaking

पिंपरी चिंचवड : किसान संघर्ष समन्वय समितीसह विविध पक्ष संघटनांनी केली कृषी कायद्यांची होळीपिंपरी चिंचवड : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना कृती समिती च्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांची आंबेडकर चौक पिंपरी येथे होळी केली. 

यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, इंदिरा काँग्रेस, बारा बलुतेदार, नागरी हक्क सुरक्षा समिती, डीवायएफआय, महासंघ, ओबीसी संघर्ष समिती, फेरीवाला क्रांती महासंघ, प्रहार जनशक्ती संघटना, स्वराज अभियान सह अनेक संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

आंदोलनामध्ये मारुती भापकर, मानव कांबळे, अनिल रोहम, गणेश दराडे, सलीम सय्यद, काशिनाथ नखाते, इब्राहिम खान, भाई विशाल जाधव, संजय गायके, संदेश नवले, अजीज शेख, शिवराम ठोंबरे, मनोज गजभार, आनंदा कुदळे, काळूराम गायकवाड, गौतम गजभार, प्रदीप पवार आदी सहभागी झाले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा