Breaking

मोठी बातमी : संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, ठाकरे म्हणाले...मुंबई : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आज संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्र यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.


यावेळी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलनाची माहिती दिली, तसेच भेट देण्याची विनंती केली. यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. 


यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी, आमदार विद्या चव्हाण आदीसह उपस्थित होते.


संयुक्त किसान मोर्चाने केलेल्या आवहानानुसार २३ ते २५ जानेवारी राजधानी मुंबई येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या ठिय्या आंदोलनात ५० हजार पेक्षा जास्त शेतकरी, कामगार सहभागी होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा