Breakingमोठी बातमी : देशाला कोरोनाची लस तयार करून देणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागली आगपुणे : देशाला कोरोनाची लस तयार करून देणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये मोठी दुर्घटना झाल्याचे समोर आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये मोठी आग लागली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे. या आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे.


सीरमच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली असून ती पसरू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ज्याठिकाणी लशीची निर्मिती केली जाते त्या बाजूला फारसं नुकसान झालेलं नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा