Breaking

आंबेगाव : आपटी येथे एक दिवस मजुरांसोबत कार्यक्रमाचे आयोजनआंबेगाव (पुणे) : आपटी येथे एक दिवस मजुरांसोबत कार्यक्रमाच्या अंतर्गत रोहयो अभ्यासक सिमाताई काकडे व अशोक पेकारी यांनी मजुरांशी संवाद साधला.


अखिल भारतीय किसान सभेचे सात्यतपूर्ण पाठपुराव्यामुळे पुणे जिल्ह्यात ठिक ठिकाणी रोजगार हमीची कामे चालू झाली आहेत. मागील काही ४ दिवसांत आंबेगाव तालुक्यातील आपटी येथे देखील रोजगार हमीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामावर येणाऱ्या मजुरांसोबत 'एक दिवस मजुरांसोबत' अंतर्गत रोजगार हमी कायदा अभ्यासक सिमाताई काकडे व किसान सभेचे नेते व रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा प्रत्यक्ष अनुभव असलेले अशोक पेकारी यांनी मजूरांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी मजुरांना रोजगार हमी कायद्याची इत्यंभूत माहिती दिली. तसेच तांत्रिक अधिकारी डोंगरे व रेडेकर यांनीही मजुरांशी चर्चा केली. मजुरांचे अनेक प्रश्न या चर्चेमधून दूर झाले.


यावेळी SFI विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व गाव विकास समितीचे अध्यक्ष अविनाश गवारी, गाव विकास समितीचे सदस्य, मजूर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा