Breaking


अमरावती : मातृभाषा मराठीचे संवर्धन करणे काळाची गरज - डॉ.संजय लोहकरे


अमरावती : बोलीभाषा या भाषेच्या अलंकार आहेत. मातृभाषा ही आपली दुसरी आई आहे. कारण मातृभाषा ही आपली दुसरी आहे आहे, कारण मातृभाषा विचाराचे भरणंपोषण करते. मातृभाषा बोली यांचा आदर करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन शासकीय ज्ञान - विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. संजय लोहकरे यांनी केले. 


रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज जन्मदिन व मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी मराठी विभागाने आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. याप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या हस्ते विद्यार्थीनीनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे उदघाटन करण्यात आले तसेच कवी कुसुमाग्रज  यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. सरोदे यांनी मराठी भाषेचे महत्व व व्यावहारिक भाषेचे महत्व आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.


या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. नासीर सय्यद, प्रा. रामदास बर्वे, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या. मराठी विभाग प्रमुख प्रा. चिंतामण धिंदळे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ योगिता रांधवणे यांनी तर आभार प्रा. सचिन कोतकर यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा