Breaking


मोठी बातमी : दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा बोर्डाचा निर्णय


मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये यांच्या परीक्षा ऑनलाइन होणार की ऑनलाइन होणार या प्रश्नावर टांगती तलवार होती. याचे उत्तर राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. १० वी, १२ वीच्या परीक्षा या ऑफलाईन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी बोर्ड अनुकूल नसल्याने ऑफलाईनच परीक्षा होणार आहेत.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. सद्यस्थितीला दहावी, बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसल्याने विद्यार्थ्यी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे. राज्यात दहावीचे १६ लाख तर बारावीचे १४ लाख विद्यार्थी आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा