Breaking


मोठी बातमी : रामदेव बाबा यांच्या कोरोनावरील औषधावर राज्य सरकार कडून बंदी


मुंबई : रामदेव बाबा यांच्या पतंजली या कंपनीने तयार केलेल्या कोरोनिल या औधषाचे केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थिती जोरदार लाँचिंग करण्यात आले. या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रमाणपत्र मिळाले असल्याचे देखील सांगण्यात आले. मात्र नंतर हा दावा खोटा असल्याचे समोर आले होते.

कोरोनिल औषधावर इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून देखील या औषधावर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. या संबंधीची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत दिली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा