Breaking
मोठी बातमी : उद्या कामगारांचा 'देशव्यापी विरोध दिवसदिल्ली : केंद्रीय कामगार संघटनांनी उद्या 'देशव्यापी विरोध दिवस' चा हाक दिली आहे. कामगार संहिता रद्द करा, शेतकरी कायदे रद्द करा यासह अन्य मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार नेते डॉ. डी. एल कराड यांनी दिली.


२२ जानेवारी २०२१ रोजी आगामी संयुक्त कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यासाठी इंटक कार्यालय, दिल्ली येथे केंद्रीय कामगार संघटनांची बैठक झाली. या बैठकीत श्रम कायद्यांच्या नियमावलीच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी श्रम मंत्रालयाने बोलावलेल्या त्रिपक्षीय बैठकीत भाजप सरकारने दर्शविलेल्या हटवादी वृत्तीचा निषेध करण्यात आला. 


श्रमसंहिता आणि नियमावलीच्या मसुद्यावर कामगार संघटनांशी तपशीलवार चर्चा होईपर्यंत श्रमसंहितांची अंमलबजावणी स्थगित ठेवण्याची कामगार संघटनांची मागणी सरकारने सपशेल फेटाळून लावली आहे. यामुळे संयुक्त संघर्ष सुरू ठेवण्याचा व योग्य वेळी जास्त दिवसांच्या देशव्यापी संपाच्या तयारीला लागण्याचा निर्णय घेण्यात आला.


श्रमसंहिता रद्द करा, कृषी कायदे मागे घ्या, वीज दुरुस्ती विधेयक २०२० मागे घ्या, रेल्वे व अन्य सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण थांबवा, गरीब कुटुंबांना उत्पन्न-अन्न सहाय्य द्या, या मागण्यांसाठी ३ फेब्रुवारी २०२१ रोजी 'देशव्यापी विरोध दिवस' पाळण्याची हाक देत आंदोलन करण्याचे आवहान केले आहे. या आंदोलनात सर्व कामांच्या ठिकाणी श्रमसंहिता आणि कृषी कायद्यांची होळी केली जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा