Breaking
बिरसा क्रांती दल : राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत लहान गटात सार्थक घोईरत, तर मोठ्या गटात सुनिल गांगोडे प्रथमबिरसा क्रांती दल सांगली आयोजित निबंध लेखन स्पर्धा


सांगली : बिरसा क्रांती दल आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात लहान गटात प्रथम क्रमांक सार्थक गोविंद घोईरत (पुणे), द्वितीय वैभव बाळू खाडे (ठाणे) ,तृतीय रोहिदास मारुती भगत (रायगड) या विद्यार्थ्यांना क्रमांअ पटकावले.


तर मोठ्या गटात प्रथम सुनिल सिताराम गांगोडे(नाशिक), द्वितीय सुमित मनोहर मोहरे (पुणे), तृतीय साक्षी गोविंद घोईरत (पुणे) या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले.


स्पर्धेत महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी यांनी केले. परिक्षक म्हणून महेंद्र गावीत, दिलीप आंबवणे, मनिराम चौधरी, नामदेव डाखोरे यांनी कामकाज पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा