Breaking

हुतात्मा नाग्या कातकरी स्मारक बांधावे, बिरसा क्रांती दलाची मागणीरत्नागिरी : दापोली येथे हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचे स्मारक बांधावे, अशी मागणीबिरसख क्रांती दलाचे अध्यक्ष. व कोकण विभाग प्रमुख यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, हुतात्मा नाग्या महादू कातकरी हे आदिवासी कातकरी समाजात दैवत असून त्यांना पूजले जाते. हुतात्मा नाग्या महादू कातकरी हे इंग्रज सत्तेविरोधात पुकारलेल्या उरण- रायगड येथील जंगल सत्याग्रहात 25 सप्टेंबर 1930 रोजी हुतात्मा झाले. स्वातंत्र्यपूर्व कालावधीत हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचे नाव अजरामर आहे. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ दापोली येथे आदिवासी कातकरी समाज भवनासमोर हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचे स्मारक बांधण्यात यावे, अशी मागणी सुशीलकुमार पावरा यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा