Breaking


डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन कडून इंधन दरवाढी विरोधात पूर्णेमध्ये निदर्शने!


पूर्णा : पूर्णा येथे आज डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या युवक संघटनेकडून इंधन दरवाढीविरोधात पूर्णा येथील टी पॉईंट येथे निदर्शने करण्यात आली. 


केंद्र सरकारकडून पेट्रोल व डिझेल तसेच LPG गॅसचे दर सतत वाढविण्यात येत आहेत. ज्याचा परिणाम सामान्य लोकांच्या जीवनमानावर होत आहे. इंधन दर वाढले म्हणजे इतर सर्वच वस्तू पदार्थ महाग होत असतात कारण ते याच इंधनाच्या दळवळणावर अवलंबून असतात.


नागरिकांवर पडणारा हा अतिरिक्त भार लक्षात घेऊन व त्यांना इंधन दरवाढीचे सोसावे लागणारे चटके याचा विचार करून पूर्णेतील तरुणांनी एकत्र येत आज पूर्णेतील नांदेड परभणीला जोडणाऱ्या टी पॉईंट येथे सरकार विरोधात निदर्शने केली. तसेच या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी परभणी यांच्या नावे तहसील कार्यालय पूर्णा यांना दिले.


यावेळी नसीर शेख, आनंद वाहिवळ, अमन जोंधळे, जय एंगडे, अजय खंदारे, सचिन नरनवरे, पांडुरंग दुथडे, किरण खंदारे, विशाल खंदारे, जाकेर शेख, सलीम शेख, फिजा शेख, राजू शेळके व इलियास आदींचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा