Breaking

शेतकरी आंदोलन : शेतकऱ्यांना रोखण्यासाठी गाझीपूर सीमेवर पोलिसांनी उभारले खिळे आणि तारांचे कुंपणनवी दिल्ली : गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सहा स्तरीय बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. धरणे सुरू असलेल्या उड्डाणपुलावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. दिल्लीहून गाझियाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर सहा स्तरीय बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. त्यात काटेरी तारांचे कुंपणही टाकण्यात आले आहे. काँक्रिटचे तीन फूट उंच दोन - दोन स्लॅब ठेवून क्राँक्रिटची भीत उभारण्यात आली आहे. त्यानंतरच्या दोन स्तरामध्ये लोखंडी बॅरिकेड्स लावले आहेत. टीकरी सीमेवरही शेतकरी धरणे देत असलेल्या ठिकाणी अशाच भीती उभारण्यात आल्या आहेत. रस्त्यावर सिमेंटचे मोठमोठे स्लॅब ठेवण्यात आले आहेत आणि बॅरिकेडिंगसोबत रस्त्यावर खिळेही ठोकण्यात आले आहेत.


मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी गाझीपूर सीमेवर खिळे आणि काटेरी तारांचे कुंपण घातले आहे. तर सिंघु सीमेवर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. 


तर कॉग्रेस नेते राहुल गांधी यांंनी सरकारवर टिका करत म्हटले आहे की, भारत सरकार, पूल बांधा, भिंती नव्हे.


तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव सिताराम येच्युरी टिका करत म्हटले आहे की, अशी लष्करी तटबंदी सहसा युद्धाच्या वेळी दिसून येते.  बीएसएफला येथे तैनात केलेल्या आमच्या सीमांचे रक्षण करण्याचे बंधन? आमच्या किसान विरुद्ध, अन्नदाता? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. पुढे येच्युरी म्हणतात, "लोकशाहीमध्ये अशा कृतींना स्थान नाही."


तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि शेतमालाला हमीभावाची खात्री देणारा कायदा करण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सर्व विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने ६ फेब्रुवारी रोजी देशव्यापी चक्का जामची हाक दिली आहे. या दिवशी दुपारी १२ ते ३ या वेळात हे चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा