Breaking


अहमदनगर : कोळेवाडी येथे संदन आदिवासी दिनदर्शिकेचे मोफत वितरण

राहुरी (अहमदनगर) : सांदण आदिवासी लोकचळवळ संगमनेर निर्मित सांदण आदिवासी दिनदर्शिका २०२१ चे गाव पातळीवरील शेवटच्या टप्प्यातील वितरण राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथे करण्यात आले.


सांदण आदिवासी दिनदर्शिका 2021 वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांदण आदिवासी लोकचळवळीचे तुकाराम कोरडे यांनी केले. यावेळी सर्वप्रथम संपूर्ण ग्रामपंचायत मध्ये आदिवासी पॅनल निवडून देणाऱ्या व सरपंच पदाची धुरा सांभाळणाऱ्या डॉक्टर जालिंदर घिगे यांचे सांदण आदिवासी लोकचळवळीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी कोळेवाडी ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांनी सांदण आदिवासी लोकचळवळीच्या सर्व टीमचे आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमा देऊन स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी लोकचळवळीचे अध्यक्ष अरविंद सगभोर यांनी केले. चळवळीच्या कार्याची माहिती उपाध्यक्ष गणेश शेंगाळ यांनी दिली. सांदण आदिवासी दिनदर्शिका 2021 ही आदिवासी समाजाच्या वैचारिक चळवळीत कोणत्या प्रकारचे कार्य करत आहे याबाबत सचिव किरण बांडे यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना सांगितले. 

कोळेवाडी चे विद्यमान सरपंच डॉक्टर जालिंदर घिगे यांनी  आदिवासी लोकचळवळीच्या वैचारिक कार्याचे कौतुक करतानाच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या!


यावेळी सांदण आदिवासी लोक चळवळीचे अरविंद सगभोर, गणेश शेंगाळ, किरण बांडे, तुकाराम कोरडे, सुनील भवारी, संजय ठोकळ, संतोष भांगरे, रवींद्र पिचड, बाळू इदे आणि भाऊराव धोंगडे हे उपस्थित होते.  यावेळी कोळेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच जालिंदर दिघे, सुनील गोंदके, सोमनाथ नवले, सुनील वायाळ, यशवंत आंबेकर, नानाभाऊ घिगे, काशिनाथ कोकाटे, बाळू आंबेकर, काशिनाथ आंबेकर, प्रदीप लेंभे, विवेक तळपे, शशिकला कोरडे, प्रियंका रणशिंग, राणी कोरडे, सारिका वायाळ, सोनाबाई वायाळ, राहुल वायाळ, राहुल जाधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नानाभाऊ दिघे यांनी सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा