Breaking


जनभूमी साहित्य : अनाथ - कवी सुधामती मुंडे (देवगावकर)


 अनाथ


आई जन्म तु दिला चूक माझी नव्हती काही 

आज मी आई आणि पप्पा शोधण्यासाठी फिरतो ठाई ठाई आयुष्याच्या वळणावर सुख शोधण्यासाठी मी फिरत राहतो पावलो पावली 

ठेच लागते पदरी पडत नाही काही सांगा ना कुठे आहे माझी सांगा ना कुठे आहे माझी आई!

आई जन्म तु दिला चूक नव्हती माझी काही !


रोज शाळेत मी जातो सर्वात जास्त अभ्यास करतो, खुश होऊन मी घर पाहतो कुणीच मला बोलवत नाही, कोणीच मला जवळ घेत नाही, असा मी काय गुन्हा केला आई जन्म तु दिला चूक माझी नव्हती काही !


मला पण खूप शिकायचं मोठं व्हायचं अधिकारी बनुन घरी मला यायचय,

हे सर्व करण्यासाठी मला आई बाबांना शोधायचय.

कोणी आणखी नाही मला मार्ग दाखवायला आई

जन्म तु दिला चूक माझी नव्हती!


काही खऱ्या आयुष्याचा आनंद मलाही मिळावा नातेवाईकांचा हात माझ्या पाठीवरून फिरावा, सर्वांच्या घासातला घास मलाही भरावा मी एक अनाथ आहे हे सर्वांना कळाले नाही,

आई जन्म तु दिला चूक नव्हती माझी काही !


माझी हृदयद्रावक भावना सांगू कुणाला ?

असा कसा मी जन्माला यायच्या आधी डाव माझा रचिला,

आई जन्म तु दिला चूक माझी नव्हती काही !


गोवर्धन दराडे भाऊ व रंजना वहिनी माझे कळीतून फुलांना आकार देणारे आई आणि बाबा 

जन्मोजन्मी त्यांचे ऋण फेडण्यासाठी येईल परतून पुन्हा पुन्हा 

हाच माझा सुखरूप तेचा निरोप माझ्या आई बाबाला

आई जन्म तू दिला चूक माझी नव्हती काही आई जन्म तु दिला चूक माझी नव्हती काही !- कवी सुधामती दादाहरी मुंडे (देवगावकर)     

- ता. केज जि. बीड

- मो. नं. - 7588336825

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा