Breaking

चित्रपट : 'SIR' एक उत्तम कलाकृती - साईनाथ जटलाडायरेक्टर रोहिणी गेरा यांची एक उत्तम कलाकृती म्हणता येईल. चित्रपटाची थीम ही लवस्टोरी आहे, पण प्रत्येक लवस्टोरी प्रमाणे ही सुद्धा वेगळी आहे. 'SIR' म्हणजे आश्विन आणि कामवाली रत्ना. दोघांचीही अभिनय प्रेक्षकांना नक्कीच भावते. त्याला जोड होती रोहिणी यांच्या लिखाणाची. 


चित्रपटाची सुरुवात 'SIR' म्हणजे आश्विनचं लग्न मोडतं व तो घरी परततो. त्याच दिवशी त्याची कामवाली रत्ना आणि ड्रायव्हर ला कामावर बोलवतो. रत्ना आणि आश्विन यांचं असं काहीही प्रेम किंवा अफेरचा दृष्टिकोन नसतो किंवा ध्यानी मनी ही नसतं. रत्नाचं लग्न झाल्यावर सहा महिन्यात ती विधवा होते. तिला शिकायची खूप इच्छा आणि तगमग चित्रपटात दिसून येते. तिला फॅशन डिझायनर बनायचं असतं. मग त्यासाठी टेलर कडे आणि नंतर क्लासेस जॉईन करून काम शिकून घेते. 'SIR' त्यासाठी परमिशन देतात. 


'SIR' तिची शिकायची तगमग पाहून तिला शिलाई मशीन गिफ्ट करतात. त्या आधी त्यांच्या वाढदिवसाला ती तिच्या हातून शिवलेलं शर्ट गिफ्ट देते. अश्याप्रकरे ते हळूहळू जवळ येत असतात. दोघांना हि एकमेकांंविषयी प्रेम निर्माण होतं. ते म्हणतात, ना प्रेमला बंधने नसतात पण आपला वर्ग/समाज बंधने निर्माण करत असते. प्रेम जरी झाला तरी इथे क्लास फॅक्टर जास्त मोठ्या पद्धतीने हायलाईट केला आहे. एक कामवालीचं त्यांच्या मालकाशी प्रेम. लोक त्याचा नेहमीच उलटा अर्थ लावणार. ह्याच भीती पोटी आणि आश्विनची जवळीकता पाहून ती काम सोडून जाते. 


आश्विन तिला तिचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करतो आणि त्याला आपल्या लाईफ पार्टनर च्या रुपात पाहू लागतो. तिला तिचा समाज, जात, वर्ग, घर, आणि नसलेलं संसार पायाला जोखडून टाकल्यामुळे ती प्रेम असलं तरी सावरते. वर्ग व्यवस्था आहे आणि ती कसा भेद निर्माण करते. त्यात अत्यंत व्यवस्थित मांडला आहे. मी काही चित्रपटाची गोष्ट पूर्ण सांगणार नाहीये. एक उत्तम रसिक असणारा व्यक्ती नक्की पाहिलं.साईनाथ जटला, एक सामान्य प्रेक्षक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा