Breaking

नांदेड : शेतकरी नेते डाॅ अजित नवले यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ डीवायएफआयशी, अंकुश माचेवाड यांचा इशारा



जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा केला जाहीर निषेध


मुखेड (नांदेड) : किसान सभेचे राज्य सचिव शेतकरी नेते काॅम्रेड डाॅ.अजित नवले यांना सोशल मिडियावर काही गुंडांनी धमकी दिली आहे, की सत्ताधारी आस्थापनेविरुद्ध संघर्ष सुरू ठेवल्यास तुमच्या वर गोळ्या घालू' अशी धमकी देण्यात आली होती.

 

डॉ. अजित नवले हे महाराष्ट्रातील अखिल भारतीय किसान सभेचे राज्यसचिव, एक संघर्षशील शेतकरी नेते आणि आमचे मार्गदर्शक व अभ्यासू वक्ते आहेत. डॉ. अजित नवले यांना धमकावणाऱ्या या भ्याडपणा करणाऱ्याचा डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाने तीव्र निषेध केला आहे.


तर डॉ. अजित नवले यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ डिवायएफआयशी राहिल. नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी व युवक रस्त्यावर उतरवू आणि उग्र आंदोलन करू असा इशारा डिवायएफआयाचे तालुका अध्यक्ष काॅम्रेड अंकुश माचेवाड यांनी दिला आहे.


माचेवाड म्हणाले, अशा धमक्या या आमच्या लोकशाही आणि घटनात्मक हक्कांवरील हल्ला आहे. अशा धमक्या आपल्याला किंवा आपल्या संघर्षाला रोखू किंवा घाबरू शकत नाहीत. आपण जनतेच्या न्याय हक्कासाठी लढता त्यामुळे सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार, शेतकरी, युवक आपल्या सोबत खंबीरपणे उभे आहेत. अशा धमक्यांचा आम्ही डिवायएफआयच्या वतिने जाहिर निषेध करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा