Breaking




नांदेड : CITU तर्फे वतीने मनपाला घेराव, तर जिल्हा कचेरीसमोर कामगार संहिताची केली होळी



नांदेड : सेंटर ऑफ ट्रेंड  युनियन (सिटू) तर्फे नांदेड महानगरपालिका पालिकेला घेराव घालत, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगार संहितांची होळी करण्यात आली. 


कामगार संहिता रद्द करा, कृषी कायदे मागे घ्या, वीज दुरुस्ती विधेयक २०२० मागे घ्या व रेल्वे व अन्य सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण थांबवा तसेच गरीब कुटुंबांना उत्पन्न-अन्न सहाय्य द्या या मागण्यांसाठी ३ फेब्रुवारी २०२१ रोजी 'देशव्यापी विरोध दिवस' हाक केंद्रीत कामगार संघटनांनी दिली होती.


यावेळी आंदोलनात कॉ. उज्वला पडलवार,कॉ.गंगाधर गायकवाड, मारोती केंद्रे, करवंदा गायकवाड, रेखा धूतडे, शेख मगदूम पाशा, विक्की गवई, सुनिल गायकवाड, जयराज गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सोपान नेवल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा