Breaking

नाशिक : राज्यपाल भेटीसाठी इपीएस 95 पेन्शनर्स फेडरेशन साकडे; भेटीसाठी वेळ द्या - राजू देसलेनाशिक : राज्यपाल भेटीसाठी इपीएस 95 पेन्शनर्स फेडरेशन साकडे घालत भेटीसाठी वेळ द्या, अशी मागणी संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. राज्यपाल नाशिक दौऱ्यात येत आहेत. त्यांनी पंतप्रधानाना वरील निर्णय घेण्यासाठी भूमिका घ्यावी यांचे निवेदन देण्यासाठी ही वेळ मागितली आहे.


इपीएस 95 पेन्शनर्ससाठी 2013 मध्ये तत्कालीन राज्य सभेचे खासदार व आजचे महाराष्ट्र चे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या अध्यक्षतेखाली पेन्शन वाढ संदर्भात कमिटी अध्यक्षतेखाली नेमली होती. कमिटीने 3 हजार रुपये दरमहा पेन्शन महागाई भत्ता सह देण्याची व मोफत आरोग्य सुविधा देण्याची शिफारस केली होती. 2014 लोकसभा निवडणूक वेळी भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले होते सरकार दिल्लीत आल्यावर 3 हजार रुपये पेन्शन देऊ मात्र अद्याप मिळाली नाही. 


राज्यपाल अभिनेते, सर्वसामान्य माणसांना भेटण्यासाठी वेळ देता तर नाशिक दौऱ्यात पेन्शनर्सला भेटण्यासाठी वेळ मिळावी ही अशी अपेक्षा पेन्शनर्स व्यक्त करत आहेत.


देशात 70 लाख पेन्शनर्स सातत्याने जगण्याइतकी पेन्शन 9 हजार रुपये व दरमहा महागाई भत्ता सह द्या  यासाठी आंदोलन करीत आहेत. आज देशात 26 लाख पेन्शनर्संना 1 हजार रुपयेच पेन्शन मिळते तर इतरांंना 2000 दरम्यान पेन्शन मिळते यात  वृद्धापकाळी दवाखानाचा खर्च ही निघत नाही. ही भूमिका राज्यपाल ना सांगण्यासाठी वेळ मिळावा, वेळ न मिळाल्यास ते पुष्प व निवेदन देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनद्वारे पेन्शनर्स फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष राजु देसले,  जिल्हाध्यक्ष सुधाकर गुजराथी, सरचिटणीस डी. बी. जोशी, कार्यध्यक्ष चेतन पनेर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा