Breaking

नाशिक : राज्यपालांना अभिनेते, नेत्यांंना भेटीला वेळ आहे, इपीएस 95 पेन्शनर्संना भेटायला वेळ नाही - राजू देसलेजिल्हाधिकारी कार्यालयातही जेष्ठांची हेळसांड, पेन्शनर्स फेडरेशनने केला राज्यपालांचा निषेध


नाशिक : राज्यपालांना अभिनेते, नेत्यांंना भेटीला वेळ आहे, इपीएस 95 पेन्शनर्संना भेटायला वेळ नाही, अशी टिका इपीएस 95 पेन्शनर्सं फेडरेशनचे राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी केली आहे. तर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दरवाजावर निवेदन चिटकवून निषेध केला. 


राज्यपाल नाशिक दौऱ्यावर आले असता, ईपीएस 95 पेन्शनर्स फेडरेशने भेटीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र आधी दिले होते. काल (दि.3) 6 वाजेपासून पेन्शनर्स फेडरेशन चे जेष्ठ नागरिक असलेले पदाधिकारी आयटक कार्यालयात बसून वाट पाहत होते. परंतु रात्री ९ वाजता जिल्हा प्रशासन प्रोटोकॉल तहसीलदार आवळकंठीकर यांनी भेेट नाकारली असल्याचे सांगितले आहे. यानंंतर पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल व जिल्हाधिकारी प्रशासन प्रशासनाचा निषेध करत पुढील काळात राज्यपाल व केंद्र सरकारचे मंत्री जिल्ह्यात आल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.


यावेळी राजु देसले, सुधाकर गुजराथी, डी. बी. जोशी, चेतन पणेर, सुभाष काकड, प्रकाश नाईक यांची उपस्थिती होती.


देशात 70 लाख पेन्शनर्स सातत्याने जगण्याइतकी 9 हजार रुपये दरमहा पेन्शन महागाई भत्ता सह द्या, यासाठी आंदोलन करीत आहेत. इपीएस 95 पेन्शनर्स साठी 2013 मध्ये तत्कालीन राज्य सभेचे खासदार व महाराष्ट्र चे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या अध्यक्षतेखाली पेन्शन वाढ संदर्भात कमिटी अध्यक्षतेखाली नेमली होती. कमिटीने 3 हजार रुपये दरमहा पेन्शन महागाई भत्तासह देण्याची व मोफत आरोग्य सुविधा देण्याची शिफारस केली होती. 2014 लोकसभा निवडणूक वेळी भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले होते की, भाजपाचे सरकार दिल्लीत आल्यावर 3 हजार रुपये पेन्शन देऊ मात्र अद्याप मिळाली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा