Breaking

नाशिक : वीज कामगारांना केली शेतकरी, कामगार व वीज बिल विधेयकाची होळीदिल्ली आंदोलनातील शहीद सीता तडवी कुटुंबासाठी 5 हजार रुपये मदत !


नाशिक : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन (आयटक) नाशिक विभाग वतीने आज (दि.3 फेब्रुवारी) विद्युत भवन नाशिकरोड येथे संप करून गेटवरती आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार विरोधी कायदे , वीज बिल विधेयक ची होळी करण्यात आली.


गेट सभा प्रसंगी वीज कामगार फेडरेशन नेते तथा आयटक राज्य उपाध्यक्ष व्ही. डी. धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली व आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. यावेळी फेडरेशनचे राज्य सचिव अरुण म्हस्के, दीपक गांगुर्डे, विभागीय नेते कॉम्रेड पंडित कुमावत,  रोहिदास पवार, खान शहनवाज यांनी मार्गदर्शन केले. 


कॉम्रेड राजू देसले म्हणाले, शेतकरी, कामगार, विरोधी कायदे रद्द झाली पाहिजेत. दिल्लीत शेतकरी 3 शेतकरी विरोधी कायदे, प्रस्तावित वीज बिल 2020 कायदा रद्द होण्यासाठी गेली 70 दिवस संघर्ष सुरू आहे. केंद्र सरकार शेतकरी आंदोलन बदनाम करीत आहे. याचा आयटक - किसान सभा जाहीर निषेध करीत आहे. कायदे रद्द होईपर्यंत लढा सुरू राहील आज वीज कामगार देशभर आंदोलन करून लढणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहेत याबद्दल वीज वर्कर्स फेडरेशनचे ही त्यांनी अभिनंदन केले.


दिल्ली येथे शेतकरी आंदोलनमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्यातील लोकसंघर्ष मोर्चा च्या सीता ताई तडवी शहीद झालेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबियांना वीज वर्कर्स फेडरेशनचे व्ही. डी. धनवटे, अरुण म्हस्के, रोहिदास पवार यांनी 5 हजार रुपयांची मदत केली. यावेळी ऑल इंडिया स्तुडेंट फेडरेशन (AISF) राज्य अध्यक्ष विराज देवांग उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा