Breaking

नाशिक : जलपरिषद मित्र परिवाराने आदिवासी भागातील पाणी व इतर समस्या सोडविण्यासाठी घेतली राज्यपालांची भेट !नाशिक : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुरगाणा तालुक्यातील भिंतघर या ठिकाणी भेट दिली. यावेळी नाशिक येथे जलपरिषद मित्र परिवार यांनी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन पेठ, सुरगाणा, त्रंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या आदिवासी तालुक्यातील पाणी, शैक्षणिक, दळणवळण, मोबाईल कनेटिव्हीटी, पर्यटन या प्रश्नांना घेऊन राज्यपालांना निवेदन दिले.


यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, आदिवासी भागातील समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक आहोत. येणाऱ्या काळात प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यावेळी दुर्वादास गायकवाड, राकेश दळवी, गीतेश्वर खोटरे, देविदास कामडी हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा