Breaking


पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टी तर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा 'सन्मान कर्मवीर पुरस्कार' देऊन सन्मान


पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टी तर्फे आज शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान कर्मवीर पुरस्कार देऊन करण्यात आला. शिक्षण, पर्यावरण, ज्येष्ठ नागरिक, प्राणी, कायदेविषयक, आरोग्य, महिला, अशा अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे यात समावेश करण्यात आला.


यावेळी विनोद अहिरे यांना पिंपरी चिंचवड भूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यांनी समाजातील तरुणांना उद्योजकता कडे वाळण्यास उद्योगिक प्रशिक्षण देणे, कर्ज उपलब्ध करून देणे असे उद्योग उभारण्यास मदतीचे कार्य करतात. तसेच अशोक तनपुरे, तुकाराम तनपुरे यांना पिंपरी चिंचवड 'सेवा गौरव पुरस्कार' देण्यात आला. वृक्षमित्र, पोलीस मित्र, वाहतूक मित्र अश्या योजनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करतात.


यावेळी आपचे प्रदेश अध्यक्ष रंगा राचुरे, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, पुणे जिल्हा संघटक अभिजित मोरे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अनुप शर्मा, प्रवक्ता कपिल मोरे, महिला अध्यक्ष स्मिता पवार, सामाजिक विंग अध्यक्ष वहाब शेख उपस्थित होते. 


आप प्रदेशाध्यक्ष रंगा रैचुरे यांनी सामजिक कार्य आणि राजकीय कार्य हे एकच आहे आणि हे दोन्ही कार्यकर्त्यांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच आप इथून पुढील सर्व महापालिका, ग्राम पंचायत निवडणुका लढवणार असे सांगितले.


यावेळी आपचे प्रवक्ते कपिल मोरे म्हणाले, अरविंद केजरीवाल आजही मूळचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, फक्त त्यांच्या कामाचा प्लॅटफॉर्म मोठा आहे. त्यांना मिळालेला मॅगसेसे पुरस्कार आणि नंतर अण्णा आंदोलन या प्लॅटफॉर्म मुळे. त्याच धरतीवर पिंपरी चिंचवड मधील सामाजिक कार्यकर्त्यांना मोठा प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचे काम आप करू इच्छिते.


अभिजित मोरे यांनी 'देणार्याने  देत जावे' ही विंदा करंदीकर यांची कविता वाचून समजाला देत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मुकुंद किर्दत यांनी सामजिक कार्यकर्ते करीत असलेल्या कामाच्या परिवर्तनाची लढाई किती महत्त्व आहे ते समजावून सांगितले.


यावेळी श्रीकांत आचार्य, आप महिला अध्यक्ष स्मिता पवार, शहराध्यक्ष अनुप शर्मा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यशवंत कांबळे यांनी सुत्र संचालन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा