Breaking


पिंपरी चिंचवड : बेशिस्त नागरिकामुळे प्रशासन हतबल


पिंपरी चिंचवड : शहरातील हजारो नागरिक मास्क वापरण्यासंबंधीच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. गेल्या वर्षी शेकडो मृत्यु कोरोनामुळे झाले आहेत.मनपाच्या विविध प्रभागात कोरोना चाचणीसाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. दररोज 2 हजाराहून जास्त नागरिकांना प्रशासन दोन दोन आठवडे कोव्हीड सेंटर मध्ये उपचार करत होते. आयुक्तांनी सूचना आणि आदेश देऊनही लोक विनामास्क फिरत आहेत. काहीजण मास्क फक्त वापरत आहोत हे दाखवत आहेत.


नाक आणि तोंड झाकल्यामुळे कोरोना संसर्ग होत नाही, हे माहीत असून सुद्धा लोक असे का वागत आहेत? लोकांना सार्वजनिक आरोग्य आणि त्याच्या शिस्तीचे महत्व अजून का कळत नाही. पोलीस आणि मनपा प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दैनंदिन कामासाठी रस्त्यावर येणाऱ्या 10 लाखाहून जास्त तरलत्या लोकसंख्येला शिस्त लावण्यासाठी प्रशासनाकडे पुरेसे कर्मचारी नाहीत.


शहरात काही प्रभागात रुग्णवाहिकांचे सायरन वाजायला सुरवात झाली आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने यंत्रणा हाय अलर्टवर ठेवली आहे. गेल्या वर्षी कोरोना लढाई संपवून निवांत झालेल्या डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांना यावेळी उसंत मिळेल असे वाटत नाही. मनपा प्रशासनाचा आरोग्य विभाग आणि त्यांचे कर्मचारी याना कोणत्याही वेळी कामावर हजर रहावे लागेल, अशी अलिखित आज्ञा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. नागरिकांनी काही गरज नसताना घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. प्रशासनाचे नियम पाळून व्यवहार केले तर परिस्थिती नियंत्रणात येईल. 


सहाय्यक आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले की शहरात 30 ठिकाणी आम्ही विनामास्क फिरणाऱ्या 400  लोकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यासाठी 13 टीम काम करत आहेत. गेल्या वर्षी 1830 लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले होते. आतापर्यंत 102900 कोरोनाबाधीत रुग्णापैकी 98,199 रुग्ण मनपाने मरणाच्या दारातून सुखरूप बाहेर काढले आहेत. मनपा आणि राज्य सरकारला प्रत्येक रुग्णामागे सरासरी 35 हजार रुपये उपचार खर्च येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा