Breaking
पिंपरी चिंचवड : मध्यमवर्गाला सवलती नसणारे आणि गोर गरिबांना महागाई देणारे बजेट - गणेश दराडेपिंपरी चिंचवड : मध्यमवर्गाला सवलती नसणारे आणि गोर गरिबांना महागाई देणारे केंद्र सरकारचे बजेट आहे, अशी टिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव गणेश दराडे यांनी केली आहे.


दराडे म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत आवश्यक असलेली वाढ आणि गुंतवणूक वाढविणे, रोजगार निर्माण करणे आणि महागाई रोखण्यासाठी मार्गक्रमण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. खासगीकरण आणि परकीय गुंतवणूकीवर अधिक अवलंबून असलेला आणि महसूल वाढविण्यासाठी कागदोपत्री नाविन्यपूर्ण कल्पनांवर आधारित हे बजेट आहे.


इंधन दरवाढ आणि सरकारी पेट्रोल, जहाज, कंपन्या, विमा, बँक विकून महसूल गोळा करण्याचे आर्थिक धोरण देशाला दिवाळखोरीत डकलणारे आहे. लोकांच्या खिशात चार पैसे राहावेत असे सरकारला वाटत नाही. अर्थसंकल्प अत्यंत प्रतिकूल आणि लोकविरोधी आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांवरील ओझे वाढणार आहे.


प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सरकारने अंदाज पत्रकात तरतूद केली आहे, असे दिसत नाही. सार्वजनिक आरोग्यावर केलेली तरतूद समाधानकारक आहे. मात्र ग्रामीण आणि अर्धनागरी भागातील सरकारी आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा