Breaking


पिंपरी चिंचवड : आवास योजनेच्या सोडतीत तांत्रिक अडचणी मुळे नागरिक हैराण, 44 हजार लोकांना घरे कधी देणार - DYFI


पिंपरी चिंचवड : प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत मनपाच्या फेसबुक आणि युट्यूबवर जाहीर करण्यात आली, मात्र लाईव्ह कार्यक्रमाचा आवाज नीट ऐकू येत नव्हता, त्यामुळे हजारो अर्जदार गोंधळून गेले. मनपाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर कोणतीही माहिती दिसून येत नव्हती.


डीवायएफआय चे शहर सचिव कॉम्रेड सचिन देसाई म्हणाले की, मनपाने पीडीएफ फाईल इंग्रजी भाषेमध्ये प्रसारित केली. पात्र, अपात्र कसे शोधायचे? ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मनपाच्या वेब साईटवर कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. सारथी हेल्प लाईनवर चौकशी करताना सांगण्यात आले की, सर्व माहिती अपलोड होत आहे. त्यामुळे वेबसाईट अपडेट व्हायला वेळ लागतो आहे.


दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेचे 47 हजार 801 अर्ज पात्र ठरले असून चऱ्होली, रावेत आणि बोऱ्हाडेवस्ती येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी घरे बांधण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी महापालिकेने अर्ज मागविले होते. एकूण 47 हजार 878 अर्ज आले होते. त्यापैकी 47 हजार 801 अर्ज पात्र ठरले आहेत.  चऱ्होलीमध्ये 1442 सदनिका, रावेतमध्ये 934 आणि बोऱ्हाडेवस्ती मध्ये 1288 अशा एकूण 3664 सदनिका असणार आहेत.


एका घरकुलासाठी 16 अर्ज आले, शहरातील गरीब लोकांना तातडीने सरकारी घरांची गरज आहे, त्यासाठी 5000 रु प्रत्येक अर्जदाराने भरले आहेत. 2017 पासून प्रधानमंत्री आवास योजनेचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे.


2022 पर्यंत सर्वांना घरे देण्यासाठी कृती कार्यक्रम महानगरपालिकेने का जाहीर केलेला नाही? असा सवाल डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया ((DYFI) चे पिंपरी चिंचवड शहर सचिव कॉम्रेड सचिन देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा