Breaking
पिंपरी चिंचवड : तरुणांची निराशा करणारा अर्थसंकल्प; बेरोजगारी हेच मोठे आवाहन - अमिन शेखपिंपरी चिंचवड : तरुणांची निराशा करणारा अर्थसंकल्प आहे. बेरोजगारी हेच मोठे आवहान असताना विशेष अशी तरतूद करण्यात आलेली नाही, अशी टिका डेमोक्रॅटिक युुुथ फेडरेशन ऑफ इंडियाचे पिंपरी चिंचवड शहर सचिव अमिन शेख यांनी केली आहे.


अमिन शेख म्हणाले, बेरोजगारी आहे, मात्र सरकारने अर्थसंकल्पात स्वयंरोजगारासाठी अनुदान दिलेले नाही. सरकारच्या अनेक बँका कोट्यवधींची कर्जे  श्रीमंतांना देतात. देशात युवापिढी समोर बेरोजगारी आहे. स्वयंरोजगाराच्या मार्गाने उदर निर्वाह करणारे लाखो युवक युवती सरकारी बँकांचे ग्राहक आहेत. त्यांना अल्पव्याज दरात कर्जे देण्यासाठी सरकारने विशेष निधी आणि योजना जाहीर केल्या नाहीत. युवक सक्षम झाला तर देश आत्मनिर्भर होईल. कंपन्यांना सवलती जरूर द्याव्यात मात्र एकूण गुंतवणूक आणि सवलती याचा विचार केल्यास उदरनिर्वाह होईल अशी कोणतीच उपाययोजना अर्थसंकल्पात दिसत नाही. 


गरिबांच्या गॅस सिलिंडरवर अनुदान अपेक्षित होते. परंतु सरकारने दिलासा दिलेला नाही. सरकारचा हा अर्थसंकल्प देश आत्मनिर्भर करणार नसून देशाची विक्री करणारा आणि खाजगी भांडवलदारांना सवलती देणारा आहे, असेही शेख म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा