Breaking


Pimpri chinchwad News : फॅशन शोच्या कार्यक्रमात तुफान गर्दी, महापौर माई ढोरेंंकडून कोरोना नियमांना हरताळ


पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका पालिकेच्या महापौर माई ढोरे यांनी आयोजित केलेल्या फॅशन शोच्या कार्यक्रमात तुफान गर्दी पहायला मिळाली. कोरोनाचे सावट गडद होत असताना महापौर माई ढोरेंकडूनच कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला.


मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवहानानुसान अनेक राजकीय व्यक्तींंनी आपले कार्यक्रम पुढे ढकलले होते. परंतु भाजपाच्या माई ढोरे यांनीच नियमांना हरताळ फासण्यात आला.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाजपच्या महापौर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनाकडे सपशेल दुर्लक्ष करत 'फॅशन शो' आयोजित करत नागरिकांचा जीव धोक्यात घातला. हे अतिशय खेदजनक आहे.या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाविषयी शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. हे लक्षात घेता, कोरोनाचे नियम मोडल्यावर प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेवर कारवाई होते, तशीच कारवाई महापौरांवरही व्हायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा