Breaking


पुर्णेत सोमवारी डीवायएफआयच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने आंदोलनाचे आयोजनपुर्णा :  डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात पुर्णा येथे (ता. २२) फेब्रुवारी सकाळी १० वाजता टी. पॉईंट येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. 


केंद्र सरकारकडून दररोज इंधनाचे दर वाढविले जात आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. केंद्र शासन  सातत्याने हे इंधन दर वाढवत आहे. आधीच या इंधनाचा आकडा शंभरी पार गेला आहे आणि आता तर जशी काय स्पर्धाच लावली आहे की एकानंतर एक जास्त दराने विक्रम मोडीत काढायचे की काय या सरकारला? केंद्र सरकारचे हे धोरण सामान्य लोकांच्या जीवावर उठलेले आहेत, सामान्य लोकांना सुखाने जगण्याची मुभा जणू देऊ नये असे एका नंतर एक धोरण केंद्र सरकार राबवत आहे. 


एकीकडे बहुतांश रेल्वे गाड्या बंद करायच्या आणि दुसरीकडे पेट्रोल डिझेलचे दर वाढवायचे हे नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आम्हाला या सरकारला विचारायचा आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही निदर्शने आंदोलन करणार आहोत असे संघटकडून सांगण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनावर नसीर शेख, आनंद वायवळ, अमन जोंधळे, पांडुरंग दुथडे, कुणाल सोनवणे, प्रबुद्ध काळे, जाकीर शेख आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा