Breaking

बीड जिल्ह्यात विद्यार्थी काँग्रेसला खिंडार, आ.विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत 'शिवसंग्राम' मध्ये जाहीर प्रवेश.बीड : बीड जिल्ह्यात विद्यार्थी काँग्रेसला खिंडार पडले असून अनेक कार्यकर्त्यांनी आ.विनायक मेटे यांच्या उपस्थितीत 'शिवसंग्राम' मध्ये जाहीर प्रवेश केला.


शिवसंग्राम पक्षसंघटना विस्ताराचे धोरण  शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी सुरु केले असून, जिल्हाभरात लोकप्रियता वाढते आहे. युवकांचा विकास, महिलांचे सक्षमीकरण, स्वछता, पायाभूत सुविधांमध्ये विकासात्मक काम करण्याचे प्रभावी धोरण राबविले जाणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील विविध स्तरातील, जातीधर्मातील युवकांना आ.विनायक मेटे यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.


बीड जिल्ह्यातील काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी मंगळवारी (2 फेब्रुवारी) शिवसंग्राम भवन, बीड येथे आ.विनायक मेटे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यामध्ये काँग्रेसचे बीड जिल्हा विद्यार्थी आघाडी सचिव व धारूर तालुकाध्यक्ष ओम बडे, राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे गेवराई तालुकाध्यक्ष नवनाथ खुणे, ज्ञानेश्वर धायतीडक, प्रवीण पोतदार, कृष्णा पवार, दीपक कडवकर, श्रीनाथ कांबळे, केशव मुंडे, गणेश जोगदंड, राहुल खुणे, तेजस कदम, आदित्य येळापुरे, रोहित गंगावणे, उदयराज तावरे, भीष्म साठे, बाळासाहेब तोंडे, प्रदीप थोरात, महेश थोरात यांचा समावेश आहे.


यावेळी ओम बड म्हणाले आयुष्यभर शिवसंग्राम संघटना तळागाळातील लोकांपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करीत राहील.


यावेळी शिवसंग्रामचे नेते रामहरी भैय्या मेटे, विनोद कवडे, अनिल घुमरे, बाळासाहेब जटाळ, बबनराव माने, नवनाथ काशिद, शेषेराव तांबे, राहुल बनगर, बंडु शहाणे, अक्षय माने, अनिकेत देशपांडे, नामदेव धांडे, विठ्ठल ढोकणे, सुनिल धायजे, अतुल लांगोरे, अनिरुध्द साळवे, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा