Breaking


पुणे : आदिवासींंच्या रिक्त झालेल्या जागा त्वरित भरा; नवनाथ मोरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीजुन्नर (पुणे) : आदिवासींंच्या रिक्त झालेल्या जागा त्वरित भरण्याची मागणी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे नवनाथ मोरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी विकास विभागाचे मुख्य सचिव व अप्पर सचिव यांच्याकडे ई - मेल निवेदनाद्वारे केली आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, वर्षानुवर्षे आदिवासी जमातीच्या हजारो जागा रिक्त आहेत. तरी या जागा भरण्यासाठी शासन पातळीवर योग्य ती कार्यवाही करावी.


आदिवासी जमातीतील अजूनही काही घटक शिक्षणाच्या प्रवाहात नाहीत. जे विद्यार्थी शिकलेले आहेत, त्यांना रोजगाराच्या संधी नाही. त्यामुळे मुलांचे लग्नाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शिक्षण घेऊनही विद्यार्थी बेकार आहेत. अशा परिस्थितीत रोजगार गरजेचा आहे.


शिकलेला तरुण ही देशाची संपत्ती आहे. जर देशाच्या तरणांच्या हातालाच काम नसेल तर देशाचे आणि राज्याचे भवितव्य अंधारात आहे. तरी शासनाने रिक्त झालेल्या सर्व जागा त्वरित भरुन आदिवासी समाजाच्या तरुणांना न्याय द्यावा, अशी विनंतीही नवनाथ मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा