Breaking


पुणे : क्रिकेटच्या सामन्यांतून मतांची गोळाबेरीज ? वाचा सविस्तरपुणे : ग्रामीण भागात क्रिकेट सामन्यांना आता उत आला आहे. गावोगावी क्रिकेटचे सामने भरू लागले आहेत. तरुणांची अफाट गर्दी याठिकाणी पहावयास मिळत असते. भागातील आणि तालुक्याभरातील संघ स्पर्धेत भाग घेत असतात. परंतु आता क्रिकेट स्पर्धेतून मतांची गोळाबेरीज करण्याचा आटापिटा लोकप्रतिनिधी करताना दिसत आहे.


क्रिकेटचे सामने आता सगळीकडेच भरत आहेत. गावाची लोकसंख्या, तेथील पकड हे लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी हजारो रुपयांची बक्षीसे देऊन उद्घाटन करतात. यावेळी तरुणांना आकर्षण करण्यासाठी भाषणबाजी करतात. आपल्या नावाची चर्चा होण्यासाठी विरोधकांवर टिकाही करताना दिसू लागले आहे. आता क्रिकेट स्पर्धा सुध्दा राजकीय आखाडे बनत आहेत. 


क्रिकेट हा एक छंद, कला, एक ध्यास आहे. त्याला राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी तरुणांच पुढाकार घेतला पाहिजे. हजार रुपयांच्या लालसेपोटी तरुणांनी लोकप्रतिनिधींंच्या भूलथापांना बळी पडू नये. व निवडणूकीच्या वेळी योग्य उमेदवारांलाच मतदान करावे, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.


क्रिकेट स्पर्धांमुळे पालक त्रस्त 


वाढत्या क्रिकेट स्पर्धांमुळे सध्या ग्रामीण भागातील पालक त्रस्त आहेत. दिवसभर क्रिकेटच्या मागे धावणारी पिढी निर्माण होत आहे. लहान्यापासून मोठ्यापर्यंत सगळे गुंग झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे घरातील कामात मदत करणारी मुले आता क्रिकेटच्या मागे धावताना दिसत आहे. स्पर्धा जिंंकली तर पार्टी, व्यसने, आणि दारुच्या आहारी गेलेली पिढी सर्वत्र पहाण्यास मिळत आहे. त्यामुळे पालक वर्ग त्रस्त असून क्रिकेटवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा