Breaking


आदिवासींच्या रिक्त जागा त्वरीत भरा, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


नाशिक : आदिवासींच्या रिक्त जागा त्वरीत भरा, या मागणीला घेऊन आदिवासी विकास परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांनी निवेदन देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की, आदिवासींंच्या रिक्त असलेल्या 97 हजार रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन. छेडण्यात येईल. तसेच मुख्यमंत्र्यांंच्या निवासस्थानी आदिवासी समाजाचे भव्य आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 


निवेदन देतेवेळी आदिवासी विकास परिषदेचे युवा उपाध्यक्ष योगेश गावित, युवा जिल्हाध्यक्ष गोकुळ टोंगारे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळा पाडवी, महिला युवा जिल्हाध्यक्ष मनिषाताई घांगळे, व रायगडनगर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा