Breaking


Sangli News : सांगली महापालिकेत भाजपाची सत्ता उलथवली; महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी

सांगली : सांगली महापालिकेत भाजपाची सत्ता उलथवण्यात राष्ट्रवादी कॉग्रेसला यश आले. राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड झाली. 


सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर काँग्रेस - राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हा जोरदार धक्का मानला जातो.


महापौर निवडीच्या वेळी भाजपची सहा मतं फोडण्यात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना मिळाली 36 मतं पडली.


सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील पक्षीय बलाबल ( एकूण जागा -78 ) 


● भाजप - 41 

● काँग्रेस -20 

● राष्ट्रवादी - 15 

● अपक्ष -2

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा