Breaking


ठाणे : जनवादी महिला संघटनेच्या आंदोलनानंतर जोरदार आंदोलनानंतर 'त्या' गुंडावर कारवाईठाणे : जनवादी महिला संघटनेच्या आंदोलनानंतर जोरदार आंदोलनानंतर सुरज माने या गुंडावर कारवाई करण्यात आली.


ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरात एक गुंड सातत्याने लोकांंना धमकवणे, मुलींना त्रास देणे अशा प्रकार करत होता. त्यामध्ये सातत्याने वाढ होत गेल्यानं सुरज माने (रा. वागळे इस्टेट, ठाणे) या अटक करावी या मागणीसाठी आज (दि. १ फेब्रु.) जनवादी महिला संघटनेने पोलिसांविरोधाच श्रीनगर पोलिस स्टेशनसमोर आंदोलन केले.


सुमारे 100 आंदोलक महिलांनी परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी जमाव बंदीचा बडगा दाखवून महिलांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त महिलांनी तिथेच निदर्शने करीत त्या गुंडाला हजर केल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिका घेतली. अखेर पोलिसांना त्याला आणून महिलांसमोर उभे करावे लागले आणि आपला खाक्या दाखवाव्या लागल्या. महिलांची तक्रार दाखल करून घेत पोलिसांनी त्या गुंडावर चॅपटर दाखल केली आणि तुरुंगात डांबले.


सदर गुंडाने 4 वर्षापूर्वी 2 लहान मुलींवर बलात्कार करून फरार झाला होता. तो परत वस्तीत येऊन उजळ माथ्याने फिरत होता व वस्तीतील पोरी बाळींना त्रास देऊ लागला होता. अखेर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी जनवादी महिला संघटनेला हे आंदोलन करावे लागले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा