Breaking


आदिवासी विद्यार्थ्यांच्या पदरी संघर्षच, शिक्षण अर्ध्यावर सुटण्याच्या भितीने मुलीचा मृत्यूमुंबई : डिजिटल इंडिया, स्मार्ट इंडिया, "बेटी बचाव, बेटी पढा़व" चे नारे किती दिले तरी आज शिक्षणासाठी एक मुलींला जीव गमवावा लागला. 


शिष्यवृत्तीच्या माध्यमातून हजारो वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा शासन प्रयत्न करत असला तरी आदिवासी समाजापर्यंत या विकासाची किरणे आजही पोहोचलेली नाहीत.


आजही हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशाच परिस्थितीत शिक्षणासाठी संघर्ष करत असलेल्या एका मुलीला जीव गमवावा लागल्याचा प्रकार पनवेलमध्ये घडला आहे. जेवणाची सोय नाही, राहण्याची सोय नाही यामुळे नर्सिंगचे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागेल याची चिंता आणि तणावात गेली 12 तास रडत बसलेल्या आदिवासी तरुणीची प्रकृती बिघडली आणि त्यातच तिचा मृत्यु झाला असा आरोप, महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष सुनील तोटावाड यांनी केला आहे. सुजाता लीलका असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती पनवेल येथील वाय. टी. एम. नर्सिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती.


कोरोनाच्या संकटामुळे आदिवासी विभागाने विद्यार्थ्यांचे हॉस्टेल, मेस अजून सुरू केलेले नाहीत. मात्र नर्सिंग कॉलेज सुरू होते. त्यामुळे इथे शिकणाऱ्या 7 मुलींनी मिळून एक रुम भाड्याने घेतली होती. सुजाताही त्यामध्येच राहत होती. मात्र घर मालकाने एवढ्या मुलींना एकत्र राहता येणार नाही, असे सांगितल्याने या मुलींनी आदिवासी समाजाच्या हॉस्टलमध्ये राहता यावे यासाठी विनंती केल्याचे तोटावाडे यांनी सांगितले. 


मात्र कोविडमुळे हॉस्टेल बंद असल्याचे सांगण्यात आले. सुजाता आणि तिच्या दोन मैत्रीणींनी पनवेलमध्ये दुसरी रूम शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अविवाहित मुलींना रूम मिळणे कठीण होते आणि भाड़े देखील परवडणारे नव्हते. त्यात सुजाताचे आई वडील डहाणूमध्ये हात मजूरी करतात. तिला दोनं बहिणी असल्याने एवढा खर्च करणे तिच्या आई वडिलांना शक्य नव्हते. मग या मुलींनी कॉलेजमधून घरी जाण्यासाठी परवानगी मागितली. पण रोज कॉलेजमध्ये यावे लागेल असा नियम असल्याने सुजाता आणि तिच्या मैत्रीणींचा धीर सुटल्याचे सांगितले जात आहे. 


अखेर जेवणाची-राहण्याची सोय नाही म्हणून त्यांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. दोन दिवस रडून रडून सुजाता एकदम गळून गेली होती. एका मैत्रिणीने रिक्षा थांबवली पण त्या आधीच सुजाता कोसळली. मैत्रिणींना तसेच तिला हॉस्पिटलमध्ये नेले. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.


व्यवस्थेचा बळी ?


शिक्षणासाठी आदिवासी मुलींचा बळी गेला आहे. हा व्यवस्थेचा बळी असल्याची चर्चा आता समाजमाध्यमांवर होत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा बळी गेलेली ही पहिलाच घटना नाही. परंतु हा व्यवस्थेचा बळी कि दुसरा कोणाचा हे आता चौकशीतूनच समोर येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा