Breaking


पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन होणार नाही ; जुने व्हिडीओ प्रसारीत केले तर होऊ शकते कारवाई ! वाचा सविस्तर

पुणे : पिंपरी चिंचवड पुणे शहरातील रिकामटेकड्या लोकांनी कोरोना काळातील जुने व्हीडिओ व्हाट्सअप्प वर प्रसारित करण्यास सुरुवात केल्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. हे सर्व रिकामटेकडे सुखवस्तू असून टाईमपास करत आहेत. कोरोनाबद्दल समाजामध्ये भय निर्माण करणाऱ्या चित्रफिती दाखवणाऱ्या या लोकांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.


सरकारचे प्रतिनिधी असलेले जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या सूचना आणि आदेश प्रसारित करण्याची नैतिक जबाबदारी प्रत्येक संवेदनशील नागरिकांची आहे. कोरोनामुळे हजारो लोक नोकरी, धंदा, व्यवसाय बुडल्यामुळे गेल्या वर्षी भीषण आर्थिक संकटात सापडले होते, पुनः ही महामारी 2021 मध्ये आल्यास जगावे कसे? या चिंतेत सामान्य लोक आहेत.


2020 मधील बातम्यांच्या चित्रफिती, व्हीडिओ प्रसारीत करून सोशल मीडियावर पुणे, पिंपरी चिंचवड शहरात सोमवार पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या सर्व अफवा असून विश्वास ठेवू नका, असे आवाहन नागरिकांना केले आहे.


नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्क वापरावेत. सोशल डिस्टन्स पाळून दैनंदिन व्यवहार करावेत, असे आवाहन राजेश देशमुख यांनी केले आहे. जुने व्हीडिओ व्हायरल करून नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण करणाऱ्या लोकांची नोंद घेतली जात आहे, असे ते म्हणाले.


पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात म्हटले आहे की, शहरात कोरोना रुग्णांची वाढ होत असली तरी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा नागरिकांची काळजी घेण्यास सक्षम आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा