Breaking

आज सादर होणार 'अर्थसंकल्प' कोणाला मिळणार दिलासा? ; अर्थसंकल्पाकडे लागले देशाचे लक्षनवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे सुमारे सात महिने देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे उद्योगधंदे, व्यापार खंडित झाला होता. या पार्श्वभूमीवर देशाचा अर्थसंकल्प आज सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संसदेत मांडण्यात येणार आहे.


अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी रोजगार निर्मितीला चालना देण्याबरोबरच सामान्यांना प्राप्तिकरात सवलती, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ, आरोग्य क्षेत्राला उभारी, उद्योगांना भरघोस सवलती इत्यादींसाठी सर्वंकष तरतुदी करण्याची आवश्यकता भासणार असून आज, १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून याच अपेक्षा असणार आहे. 


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनाच्या महासाथीने आपली गडद छाया अर्थव्यवस्थेवर सोडली आहे. टाळेबंदीने आक्रसलेला रोजगाराचा बाजार आर्थिक लसीच्या प्रतीक्षेत आहे.


ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनीची अपेक्षा आहे. आरोग्य क्षेत्रही बूस्टरच्या अपेक्षेत आहे. तर उद्योगांना सवलतींची आवश्यकता आहे. इंधनदर रोज नवे विक्रम स्थापित करत असल्याने महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा