Breaking


दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पुर्ण


मुंबई : दिल्ली सुरु असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला आज (दि.६ मार्च) १०० दिवस पुर्ण झाले. तीन शेेतकरी कायदे रद्द करा, शेतमालाला हमीभाव देणारा कायदा करा, नवीन प्रस्तावित विज विधयेक रद्द करा या मागण्यांना घेऊन हे शेतकरी आंदोलन सुरु आहे.


देशभरातील हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि वेगवेगळ्या राज्यातील शेतकरी दिल्लींच्या सिमांवर ठाण मांडून बसले आहेत. जोपर्यंत शेतकरी कायदे रद्द केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे.


देशातील ५०० पेक्षा जास्त किसान संघटना सहभागी झाल्या आहेत. केंद्र सरकार शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याची चिन्हे दिसत नाही. उलट शेतकरी आंदोलन तीव्र होतानाच दिसत आहे. या आंदोलनात २५० हून अधिक शेतकरी शहीद झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा