Breakingआरोग्य व्यवस्थेच्या बेजबाबदारपणामुळे 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू! यास सरकार आणि महानगरपालिकाच जबाबदार - DYFI


मुंबई : भांडुपच्या ड्रीम्समॉलमध्ये कोरोना उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या सनराईज रुग्णालयात गुरुवारी मध्यरात्री आग लागल्याने तेथील कोरोना बाधित 12 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यातील 22 कोरोना पोजीटीव्ह रुग्ण  बेपत्ता झाले आहेत. कोणत्याही प्रकारची अग्निप्रतिबंधक अटींची पूर्तता न करताच मॉलमध्ये हे रुग्णालय उभारण्यात आले होते. ज्यास पूर्णतः सरकार आणि महापालिका प्रशासन जबाबदार आहेत, असा आरोप करत डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.


डीवायएफआय ने म्हटले आहे की, सरकार व महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची सुरक्षितता न बाळगल्याने निष्पाप 12 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा आपघात नसून हत्याच म्हणावी लागेल. किमान सुरक्षितता, सोयीसुविधांची पूर्तता न करता ड्रीम्समॉलमध्ये कोरोना रुग्णालय कसे उभारले गेलेे हा मोठा प्रश्न आहे. नुकतीच भंडारा जिल्ह्यातील सिव्हील हॉस्पिटल मध्ये लागलेल्या आगीत 11 नवजात अर्भकांच्या मृत्यूची भीषण दुर्घटना ताजी असतानाच* अशा प्रकारची घटना  मनाला हादरून टाकणारी आहे हे आरोग्य व्यस्थेच्या निष्काळजीपणामुळे घडते याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करण्याची घटना आहे.


डीवायएफआयने या घटनेची तात्काळ सविस्तर चौकशी करून यातील सर्व जबाबदार अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य आरोग्य मंत्र्यांनी भंडारा घटनेनंतर काय पाऊले उचलले त्यानंतर अशा घटना पुन्हा घडतात याची देखील चौकशी केली जावी. आरोग्य मंत्र्यांना याची गांभिर्य वाटत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असेही म्हटले आहे.


माणस होरपळून मरतात आणि सरकार, यंत्रणा अमानवीय पध्दतीने लोकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे. राज्यात दुसऱ्यांदा अशा प्रकारची आग  हॉस्पिटलमध्ये लागून माणसं गुदमरून होरपळून  मरतात खूप भयानक आहे. आणि हे निंदनीय आहे, असे म्हणत डीवायएफआयने राजभरातील सर्व सरकारी व खाजगी कोव्हीड रुग्णालय जे सरकारच्या नियंत्रणात आहेत. त्या सर्व हॉस्पिटल ठिकाणी चांगल्या दर्जाची अग्निप्रतिबंधक यंत्रणा उभी करावी. आणि त्यावर निरीक्षण करून त्याचा सातत्याने पाठपुरावा करावा, अशी मागणी केली आहे.


सर्वसामान्य लोकांच्या जिवाची किंमत सरकारला नाही. भांडुप रुग्णालयात मृत्यू पावलेल्या कुटुंबाना फक्त पाच लाख रुपये मदत देण्याच सरकारने जाहीर केले हे लज्जास्पद आहे. परिस्थितीने ग्रासलेल्या लोकांच्या जिवांची किंमत करून सरकार थट्टा करत आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या व जीव गमवावा लागला त्या सर्वांची जबाबदारी सरकारची आहे.त्यामुळे या घटनेत जीव गमवावा लागलेल्या त्या प्रत्येक कुटुंबास कमीतकमी 25 लाख रुपयांची मदत सरकारने करावी तसेच 22 बेपत्ता रुग्णाना शोधून त्यांना चांगल्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था करून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी, मागणी राज्य सचिव प्रीती शेखर, राज्याध्यक्ष सुनील धनवा यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा