Breakingएकाच दिवशी १२४८ पॉझिटिव्ह, पालिका कारभार निम्या मनुष्यबळावर


पिंपरी चिंचवड : औद्योगिक नगरीला कोरोनाचा विळखा वाढला असून  बुधवारी १२४८ नागरिक संक्रमित. या पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश पाटील यांनी अ आणि ब गटातील अधिकारी वगळून दैनंदिन ५० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश पाणीपुरवठा, आरोग्य, वैद्यकीय, विद्युत विभाग, अग्निशमन, रुग्णालये यांना लागू होणार नाही, असे म्हटले आहे.


शहरातील बाजारपेठा, विवाह समारंभ, सर्व सार्वजनिक धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, कार्यक्रमांंवर निर्बंध आहेत. २०२० च्या मार्च मध्ये कोरोनाने शहराला विळखा घालायला सुरुवात केली होती. याची आठवण आता नागरिकांना येऊ लागली आहे.


लॉकडाऊनचा विचार नाही, असे आयुक्त सांगत असले तरी रुग्णसंख्या वाढत गेल्यास अतिशय कठोर निर्बंध लादले जातील, अशी दाट शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा