Breaking


पश्चिम बंगालमध्ये 6 भाजप कार्यकर्ते बॉम्ब हल्ल्यात जखमी, भाजप - तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप


पश्चिम बंगाल : सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात भाजपाचे सहा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. यामधील दोघांची स्थिती गंभीर आहे. शुक्रवारी रात्री लग्नावरुन परतत असताना काही अज्ञातांकडून बॉम्बहल्ला करण्यात आला. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


जखमी भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस असल्याचा आरोप केला आहे. आपण लग्नातून परतत असताना बॉम्बहल्ला करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. शोवन देबनाथ, विक्रम, अर्पण, स्वपन, महादेव अशी जखमी झालेल्यांची नावं असून यामध्ये अजून एकाचा समावेश आहे.


दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने भाजपा नेते वरुण प्रामाणिक यांनी हा बॉम्ब तिथे ठेवला होता, ज्यामध्ये त्यांचे सहा कार्यकर्ते जखमी झाले, असा दावा केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा