Breaking



पुणे विभागातील 6 लाख 13 हजार 53 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात कोरोना बाधित 6 लाख 55 हजार 871 रुग्ण


पुणे : पुणे विभागातील 6 लाख 13 हजार 53 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 55 हजार 871 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 222 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 596 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.53 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.47 टक्के आहे.


पुणे जिल्हा 


पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 40 हजार 248 रुग्णांपैकी 4 लाख 8 हजार 770 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 22 हजार 142 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 336 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.12 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  92.85 टक्के आहे.


सातारा जिल्हा


सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 60 हजार 853 रुग्णांपैकी 57 हजार 132 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 856 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 865 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


सोलापूर जिल्हा


सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण  54  हजार 854 रुग्णांपैकी 51 हजार 442 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 375 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 769  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


सांगली जिल्हा


सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49  हजार 4 रुग्णांपैकी 46 हजार 860 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 321 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 769 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


कोल्हापूर जिल्हा


कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण  50 हजार 912  रुग्णांपैकी 48  हजार 849 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  312 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 751 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 622 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 182, सातारा जिल्ह्यात 154, सोलापूर जिल्ह्यात 164, सांगली जिल्ह्यात  84 तर  कोल्हापूर जिल्ह्यात 38 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ  झालेली आहे.


कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 


पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या  रुग्णांमध्ये  एकूण  2 हजार 61 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 876, सातारा जिल्हयामध्ये 12, सोलापूर जिल्हयामध्ये 125, सांगली जिल्हयामध्ये 30 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 18 रुग्णांचा समावेश आहे. पुणे विभागातील सर्व्हेक्षण आजपर्यत विभागामध्ये एकुण 43 लाख 56 हजार 254 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  6 लाख  55  हजार 871 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा