Breakingधक्कादायक : जुन्नर तालुक्यात ९१ कोरोना पॉझिटिव्ह, ग्रामीण भागात होतोय शिरकाव


जुन्नर : देशभरात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. तालुक्यात मागील २४ तासात ९१ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.


यामध्ये जुन्नर नगरपालिका १४, ओतूर १०, गुंजाळवाडी आर्वी ८, नारायणगाव ७, हिवरे तर्फे ना.गाव ७, आगार ६, पिंपरी पेंढार ४, वडज ४, बादशाह तलाव ३, शिरोली बु. २, वडगांव कांदळी २, काळवाडी २, बेल्हे २, राजूर नं. २, कांदळी २, आळे २, संतवाडी १, वारुळवाडी १, मांजरवाडी १, मढ १, येडगाव १, आर्वी १, खामंडी १, उदापूर १, डिंगोरे १, पिंपळवंडी १, सावरगाव १, कुमशेत १, चिंचोली १, कुसूर १ यांचा समावेश आहे.


तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ७ हजार २९४ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ५३४ तर आता पर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २७० असून सध्या तालुक्यात ४९० ऍक्टिव करोना रुग्ण आहेत.


तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होताना दिसत आहे. प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असली तर ग्रामीण भागातील शिरकाव रोखण्यात प्रशासन अपुरे पडत असल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस तालुक्यातील संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.


सार्वजनिक समारंभात कोरोना नियमांना हरताळ !


ग्रामीण आणि शहरी भागात सार्वजनिक कार्यक्रमांंना जोर चढला आहे. विशेष करुन लग्न समारंभ आणि दशक्रिया विधी कार्यक्रमांंत कोरोना नियमांना पुर्णतः हरताळ फासले असल्याचे दिसत आहे.लग्न समारंभांना असलेली ५० व्यक्तींंच्या अटीस सर्वच ठिकाणी हरताळ फासले जात आहे. स्वत: लोकप्रतिनिधी अनेक ठिकाणी उपस्थित असतात. 


स्वतः ची काळजी हाच एक उपाय !


कोरोना काळात मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे, सँनिटायझर वापरे, हात वारंवार स्वच्छ करणे हे उपाय कोरोनापासून वाचवू शकते. नागरिकांनी प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा