Breaking


मोठी बातमी : नाशिकमध्ये होणार ९४ वं अखिल भारतीय साहित्य संमेलन स्थगित ; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घेतला निर्णय


नाशिक : नाशिक मध्ये होणार 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे. निश्चित वेळेत ठरलेले साहित्य संमेलन आता पुढे ढकलण्यात आले आहे.


यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 94 वे साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात असल्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला आहे अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली. साहित्य संमेलन 27 ते 29 मार्च घेण्यात येणार अशी चर्चा होती मात्र कोरोनामुळे स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यावर तारखा जाहीर करू अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेत घेण्यात आली आहे.


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन पुढे ढकलावे अथवा ऑनलाइन पद्धतीने घ्यावे, असा सूर साहित्यिक आणि नाशिककरांकडून येऊ लागला होता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा